अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार

वसई:वसई आणि नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या आणखी दोन घटना घडल्या आहेत पहिल्या घटनेत नालासोपारा येथे सावत्र पिता १५ वर्षीय मुलीवर मागील ३ महिन्यांपासून बलात्कार करत होता. तर दुसर्‍या घटनेत नालासोपार्‍यात एका इसमाने आपल्या १७ वर्षीय पुतणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला आहे.

लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी तुळींज आणि पेल्हार पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या प्रकरणात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. चाळीस वर्षे सावत्र पिता १५ वर्षीय मुलीवर सतत तीन महिने बलात्कार करत होता. ४ जून ते २५ ऑगस्ट या कालावधीमध्ये हा सावत्र पिता मुलीला धमकावून घरात कोणी नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. कोणाला सांगितलं तर तुला आणि तुझ्या लहान बहिणीला मारून टाकेल अशी धमकी तो देत होता. अखेर हा अत्याचार सहन न झाल्याने या तिने मंगळवारी आपल्या आईला हा प्रकार सांगितला. आईने लगेच तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी सावत्र पित्यावर बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दुसरी घटना नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची आहे.  मंगळवार २६ ऑगस्ट रोजी दहिसर येथे राहणारे तिथे काका घरी आले. यावेळी घरी कुणी नव्हते. त्याने तिला धमकावून तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. संध्याकाळी आई घरी आल्यावर हा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला आणि त्यानंतर त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पेल्हार पोलिसांनी आरोपी काका विरोधात पोक्सो आणि बलात्कार अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow