मीरा रोडमध्ये लठ्ठपणाच्या समस्येवर उपचार केंद्र

भाईंदर : देशा मध्ये झपाट्याने वाढत असलेली लठ्ठपणाची समस्या गंभीर वळण घेत असल्याने त्याला तोंड देण्यासाठी मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रुग्णालयात लठ्ठपणाच्या समस्येवर उपचार केंद्र सुरू केले आहे. हे नवीन केंद्र लठ्ठपणा, मेटाबॉलिक विकार आणि वजनाशी संबंधित आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना वैज्ञानिक आणि सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करून देणार आहे.

 केंद्राबाबत माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकात परिषदेत बोलताना मेटाबॉलिक आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. राजीव मानेक यांनी सांगितले की, भारतामध्ये प्रौढांसोबतच मुलांमध्येही लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींमध्ये घट ही त्यामागची प्रमुख कारणे असून जागतिक आरोग्य अहवालांनुसार, गेल्या दोन दशकांत भारतातील लठ्ठपणाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. विशेषतः शहरी भागातील तरुणांमध्ये ही समस्या अधिक चिंताजनक बनत आहे.

यावर मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयाच्या केंद्रात मधुमेह, उच्च रक्तदाब, स्लीप अॅपनिया, फॅटी लिव्हर, सांधेदुखी आणि हृदयविकाराचा धोका यांसारख्या लठ्ठपणाशी संबंधित आजारांवर विशेष उपचार केले जाणार आहेत. आधुनिक बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक उपचारांमुळे जगभरातील रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. योग्य वैद्यकीय मार्गदर्शनामुळे रुग्णांना दीर्घकालीन वजन नियंत्रण आणि लठ्ठपणाशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळू शकेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow