दिवाळी पहाटनिमित्त ढोल-ताशा पथकांचा महावादन

विरार : यंग स्टार ट्रस्ट तर्फे शनिवारी २ नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाट निमित्त विरार पश्चिमेला जुने विवा कॉलेज येथे दिवाळी पहाट निमित्त ढोल ताशा पथकांचे महा वादनाचे आयोजन करण्यात आले होते. या महावादनामध्ये एकूण नऊ पथकांचा समावेश होता. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पडला. महा वादनात शंभरहून अधिक ढोल या ठिकाणी वाजवण्यात आले त्याचबरोबर ताशांचा देखील जोरदार आवाज घुमला. मार्तंड, आदिशक्ती, रुद्र ध्वज, अस्तित्व , शिवाय , पांडव , रणधीर, परब्रम्ह, शिवर्पण या नवपतकांनी एकत्रित येऊन हे महावादन केले. यावेळी वसई विरार चे प्रथम महापौर राजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती जीतू भाई शहा, मा.
नगरसेवक हार्दिक राऊत, मा. नगरसेवक नरेंद्र पाटील हे उपस्थित होते. दिवाळी पहाट निमित्त विविध कार्यक्रम यंग स्टार तर्फे आयोजित केले जातात त्यापैकी महावादानाचा हा कार्यक्रम गेले अनेक वर्षांपासून नित्यनियमाने पार पडत आहे. दरवर्षी या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद तसेच नागरिकांची गर्दी हे देखील वाढत चललेलं आहे. यंदाच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच अनेक तास हे वादन सुरू असून या ठिकाणी युवा, युवकांनी तसेच वादकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा भरघोस आनंद घेतला.
What's Your Reaction?






