नवी मुंबईत १० ऑगस्टला मनसेची वार्षिक 'प्रॅक्टिस दहीहंडी' उत्सव

नवी मुंबईत १० ऑगस्टला मनसेची वार्षिक 'प्रॅक्टिस दहीहंडी' उत्सव

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी ‘प्रॅक्टिस दहीहंडी’ यंदाही नेरुळमध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत, हा सांस्कृतिक सोहळा नेरुळ सेक्टर २ मधील वरणा चौकात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन मनसे नवी मुंबई शहर सहसचिव अभिजित देसाई आणि अनुष्का अभिजित देसाई यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. जनमाष्टमीपूर्वीचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ‘प्रॅक्टिस दहीहंडी’ उत्सवात नवी मुंबईतील वातावरणाला चैतन्य मिळणार आहे.

कार्यक्रमासाठी मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत मनसेचे आमदार राजू पाटील आणि पक्षाचे शहराध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे यांचीही उपस्थिती राहणार आहे.

या वर्षीच्या दहीहंडीमध्ये १०० हून अधिक गोविंदा पथके सहभागी होणार असून, त्यांनी सुसंघटितपणे आणि पारंपरिक पद्धतीने मानवी मनोरे उभारण्याची तयारी केली आहे. या उपक्रमातून युवकांमध्ये संघटन कौशल्य, चिकाटी आणि सण साजरा करण्याची एक वेगळीच ऊर्जा दिसून येते, असे आयोजक अभिजित देसाई यांनी सांगितले.

संपूर्ण नवी मुंबईतील रहिवाशांना आणि कुटुंबांना या सोहळ्याला हजेरी लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून, ‘प्रॅक्टिस दहीहंडी’ हा एक सांस्कृतिक, सामाजिक आणि कुटुंबवत्सल अनुभव ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow