नालासोपाऱ्यातील पराडकर कुटुंबावर काळाचा घाला एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

वसई: रविवारी सकाळी खेड येथे झालेल्या अपघातात नालासोपाऱ्यातील पराडकर कुटुंबाचा दुदैवी अंत झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील आई- वडील व मुलगा या तिघांचा मृत्यू झाल्याने रमेश हाईट्स परिसरात शोककळा पसरली आहे. नालासोपारा पश्चिमेच्या रमेश हाईट्स इमारतीत मेधा पराडकर (४९) परमेश पराडकर (५२) व मुलगा सौरभ पराडकर (२७) हे तिघेही मागील पाच ते सहा वर्षांपासून राहत होते. रविवारी त्यांच्या जवळच्या नातेसंबंधात एका व्यक्तीचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारा साठी देवरुख येथे त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत निघाले होते.
मुंबई गोवा महामार्गावर देवरुख येथे जाताना खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून ही सेव्हन सीटर कार थेट दोन पुलांच्या मधून जगबुडी नदीपात्रात कोसळून अपघात घडला यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला यात. त्यात नालासोपारा येथे राहणाऱ्या पराडकर कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नालासोपारा येथील रमेश हाईड्स इमारतीत शोककळा पसरली आहे. परमेश यांचा वाहनचालकांचे काम करीत होते तर मेधा यांची सँडविच विक्रीचा स्टॉल आहे. तर मुलगा मुंबई महापालिकेत नोकरीला होता. पराडकर कुटुंब नेहमीच हसते- खेळते असे त्यांचे कुटुंब होते. मेधा या चांगल्या स्वयंपाक करीत असल्याने त्यांच्या सोसायटीच्या पूजा यासह विविध कार्यक्रमात त्या अग्रस्थानी असायच्या. सर्वांशी मिळून मिसळून आनंदी राहायच्या आज त्यांच्या पूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी दिली आहे.
What's Your Reaction?






