वसई विरारमध्ये नागरी समस्यांवर काँग्रेस आक्रमक

वसई विरार:महानगरपालिकेच्या आयुक्त अनिल पवार यांना फोनवरून कानउघडणी केली होती. त्यानंतर गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश प्रमुख समीर सुभाष वर्तक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आयुक्तांची भेट घेतली आणि नागरिकांच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. समीर वर्तक यांनी यावेळी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 69 गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेवर तसेच दिवाणमान येथील सर्वधर्मीय दफनभूमी आणि वसई शहरात पुराच्या समस्या सोडविण्यासाठी IIT व NEERI यांनी सुचवलेल्या धारणा तलावांच्या (Holding Ponds) निर्मितीबाबत सखोल चर्चा केली. या चर्चेने महानगरपालिकेच्या आयुक्त आणि अधिकाऱ्यांना अडचणीत आणले. या बैठकीत समीर वर्तक यांच्यासोबत पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस अम्मार पटेल, सचिव आमिर देशमुख, अल्पसंख्यांक विभागाचे वसई विरार जिल्हाध्यक्ष अर्शद डबरे, नालासोपारा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष शहझाद मलिक, विद्यार्थी काँग्रेसचे (NSUI) जिल्हाध्यक्ष रितेश सोलंकी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख आलम अन्सारी आणि इतर काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र महानगरपालिकेच्या कारभाराबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. वर्तक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यापुढेही या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
What's Your Reaction?






