मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपुर्ती सोहळा मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सोलापुर येथे आयोजित करण्यात आले आहे. त्या सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा जाहीर विरोध असल्याचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी सोलापूर शहर अध्यक्ष सतीश बुजूरके, अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, अक्कलकोट शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, तमण्णा घोडके, अभिमन्यू काळे,निलेश लवटे, दाजी कोळेकर, रवी बजंञी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वचनपुर्ती सोहळ्याचा कार्यक्रम सोलापूर येथे मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या वचनपुर्ती सोहळ्यासाठी जिल्ह्यातून ३० हजार महिलांना आणण्यासाठी राज्य सरकारने ४०० बसेसची सोय केलेली आहे. तसेच भोजन व्यवस्था, पाणी, अनुषंगीक व्यवस्था इत्यादी जबाबदारी पुरवठा विभागावर सोपवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागावर पावसाळी परीस्थिती पाहता योग्य मंडप व अनुषंगीक व्यवस्था योग्य पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान हा वचनपुर्ती सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शासकीय यंञणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून कामे करावेत अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. या वचनपुर्ती सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा कडकडीत विरोध आहे. वचनपुर्ती सोहळा घ्यायचाच असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वताच्या पक्षाच्या वतीने खर्च करुन हा वचनपुर्ती सोहळा घ्यावा. जनतेच्या पैशावर उधळपट्टी करुन राज्यावर कर्जाचे डोंगर उभारण्यात येऊ नये. या कार्यक्रमाला वारेमाप खर्च होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सोहळ्यास सोलापुरात रासपचा विरोध
अखेर दहा वर्षांनी होणार महात्मा गांधींच्या अर्धपुत...
भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारात राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अर्धपुतळा बसवण्याचा दहा वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०१६ रोजी माजी विरोधी पक्षनेते आसिफ ...
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
सिंधुदुर्ग - दारूसह ५० लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
सिंधुदुर्ग: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या केल्याप्रकरणी राज...
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर
लातूर:जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या...
राज ठाकरे आघाडीत आले तर 'इंडिया' आघाडी त्यांचे स्वागत करेल: राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांचे विधान
पुणे :...
म.प्र. जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू, मेळघाटमधून स्थलांतरित झाल्याची शक्यता
अमरावती :धारणी तालुक्यात सीमालगत जवळच असलेल्या बुरहानपुर जिल्ह्यातील न...
Previous
Article