नालासोपाऱ्यात अनधिकृत रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई
वाहतूक नियंत्रण विभागाकडून २० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. शहरात दीड लाख रिक्षांपैकी ५० टक्के रिक्षा अनधिकृत असल्याचा दावा केला जात आहे. आतापर्यंत केवळ ४० हजार रिक्षांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आहे.

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेच्या तुळींज ब्रीज परिसरात वसई झोनच्या वाहतूक नियंत्रण विभागाकडून अनधिकृत रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी २० रिक्षा जप्त करण्यात आल्या. वसई विरार शहरात चालविल्या जाणाऱ्या अनधिकृत रिक्षांची संख्या मोठी आहे. रिक्षा चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. यांच्यावर कारवाई करण्यासाठी आता वाहतूक विभागाने मोहीम सुरु केली आहे.
शहरात अनधिकृत रिक्षा चालकांची संख्या नालासोपाऱ्यात सर्वाधीक आहे. रिक्षांची वाढती, मुख्य रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या रिक्षा यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे देखील कठीण होऊन जाते. दुकानांच्या परिसरात होणाऱ्या अनधिकृत रिक्षा वाहनतळामुळे व्यापाऱ्यांना देखील अडचणींना सामना करावा लागतो.
शिवसेना उध्द्वव बाळासाहेब गटाचे सुरेंद्र सिंह म्हणाले की, शहरात दीड लाखांहून अधिक रिक्षा आहेत, ज्यातील ५० टक्के रिक्षा या अनधिकृत पद्धतीने चालविल्या जातात. शहरातील अशा अनधिकृत रिक्षांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात नाही यामुळे शहरात अनधिकृत रिक्षा वाढत आहे असेही सिंह यांनी सांगितले.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अनिधकृत रिक्षांची संख्या लक्षात घेता ही कारवाई केली जात आहे. नालासोपाऱ्यात लायसन बॅच आणि परमिट शिवाय चालविल्या जाणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली जात आहे. ही कारवाई सिनिअर पीआय महेश शेट्टये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस विनोद जाधव आणि त्यांच्या टीमकडून केली जात आहे.
What's Your Reaction?






