नाशिक : झेन गाडीत सापडले 33 लाख; दोन जण ताब्यात

नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांनी दुगाव येथे स्थिर तपासणी नाकात तपासणी सुरू असताना एका गाडीतून सुमारे 33 लाख रुपये जप्त केले आहे. या संदर्भात दोघांना ताब्यात घेतले असून पोलिसांबरोबरच आयकर विभागाने देखील यांची समांतर चौकशी सुरू केलेली आहे. विशेष म्हणजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची खरी रणधुमाळी आता सुरू झालेली आहे आणि याच्या पहिल्या टप्प्यांमध्येच नाशिक ग्रामीण पोलिसांना एका कारवाई मध्ये चांगले मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघाच्या सीमेरेषेवरती स्थिर तपासणी नाके सुरू करण्यात आलेले असून या ठिकाणी पोलीस महसूल विभागाचे कर्मचारी व अन्य विभागाचे कर्मचारी यांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी हे पथक तपासणी करत आहेत
अशीच तपासणी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने नाशिक गिरणारे रोड वरती दुगाव येथे सुरू करण्यात आलेल्या तपासणी नाकाच्या ठिकाणी सुरू होती. त्या ठिकाणी गुरुवारी सायंकाळच्या वेळेस एका झेन या चार चाकी गाडीतून पैसे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या गाडीची तपासणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली. त्यामध्ये 33 लाख 7 हजार रुपये एवढी रक्कम सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रांत देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक निखिल निखलेकर पोलीस उपाधीक्षक खेडकर नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले पोलीस कर्मचारी नाईक विक्रम कडाळे निलेश मराठे राहुल कांबळे महिला कर्मचारी शितल बोडके यांनी केली आहे. पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या स्थिर तपासणी नाक्यावरती झालेल्या कारवाईनंतर या सर्व प्रकरणाचा तपासता पोलिसांबरोबरच आयकर विभागाने देखील समांतर चौकशी सुरू केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्तापर्यंत या गाडीमध्ये असलेल्या दोन जणांना ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारी नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिलीच विधानसभा निवडणुकीसाठी ची प्रचार सभा होत आहे आणि या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या पूर्व संध्येला नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती रक्कम मिळाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत नाशिकमध्ये आहे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका बिगाराच्या घरातून लाखो रुपये जप्त करण्यात आले होते. तर, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दी मधून एका गाडीतून रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर पिंपळगाव बसवंत या ठिकाणी रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. त्यानंतर ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
What's Your Reaction?






