पावसाळ्यात विजेच्या अपघातांपासून सावधगिरी बाळगा – महावितरणचे नागरिकांना आवाहन

वसई आणि पाघर परिसरात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित

पावसाळ्यात विजेच्या अपघातांपासून सावधगिरी बाळगा – महावितरणचे नागरिकांना आवाहन

पाघर :पावसाळ्यात वादळी वारे, संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या धोका टाळण्यासाठी महावितरण कंपनीने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर वसई व पाघर परिसरासाठी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून, विजेच्या कोणत्याही अनुचित घडामोडी आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संभाव्य धोके आणि सूचना

पावसाळ्यात झाडे व फांद्या तुटून वीज तारांवर कोसळणे, उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट, बाह्य वीज संयंत्राचे नुकसान, तसेच पूरग्रस्त भागात विजेचा धक्का बसण्याचा धोका संभवतो. यामुळे सार्वजनिक ठिकाणी व घरगुती वीज उपकरणांपासून योग्य अंतर राखणे गरजेचे आहे.

महावितरणने नागरिकांसाठी खालील सावधगिरीचे उपाय सुचवले आहेत:

  • कोसळलेल्या किंवा सैल वीज तारांपासून दूर राहा.

  • भिजलेल्या हातांनी विद्युत उपकरणे वापरू नका.

  • पुराच्या पाण्यात वीज उपकरणे किंवा मीटर बॉक्स असतील तर त्यांना स्पर्श करू नका.

  • रस्त्यांवर पडलेल्या विद्युत खांबांबाबत त्वरित माहिती द्या.

वसई व पाघर परिसरातील नागरिकांनी कोणताही वीज संबंधित अपघात, तुटलेली वीजतारी, शॉर्टसर्किट किंवा धोका जाणवला तर महावितरणच्या नियंत्रण कक्षाशी २४x७ संपर्क साधावा.“पावसाळ्यात वीज अपघात रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही अनुचित घटना दिसताच तात्काळ कळवावे,” असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow