मध्य रेल्वेवर सणाची गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध

मध्य रेल्वेवर सणाची गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध

मध्य रेल्वेवर सणाची गर्दी टाळण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध मध्य रेल्वेने आगामी सणासुदीच्या काळात प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि स्टेशन परिसरात प्रवाशांची हालचाल सुरळीतपणे सुनिश्चित करणे हे याचे उद्दिष्ट आहे. दिवाळी सण आणि छठ पूजेदरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध दि. ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू आहेत.

खालील स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री प्रतिबंधित आहे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ,दादर ,लोकमान्य टिळक टर्मिनस ,ठाणे कल्याण ,पुणे ,नागपूर सूट:

ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना प्रवास सुलभ व्हावा यासाठी या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow