तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह क्षितिज ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नालासोपारा : नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार हितेंद्र ठाकुरांसह, माजी महापौर प्रविणा ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, नालासोपारा नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष उमेश नाईक, ज्येष्ठ नेते बबनशेठ नाईक, वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम उपमहापौर सगीर डांगे आणि इतरही ज्येष्ठ नेते आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या वेळी तरुणांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली.
हजारो कार्यकर्ते यावेळी आपल्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांना पिवळे झेंडे बांधून रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी ४०० पेक्षा जास्त वाहनांचा ताफा रॅलीत सहभागी झाला होता. बहुजन विकास आघाडीचा जयजयकार करत नालासोपारा पश्चिम येथील बघून विकास आघाडीच्या भवन पक्ष कार्यालयातून सुरु झालेली रॅली वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या परिसरापर्यंत मोठ्या उत्साहात कार्यकर्ते सहभागी झाले होते. बँड, कच्चीबाजा, ढोलताशा आणि कार्यकर्त्यांच्या घोषणा यामुळे म्हाडा परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर क्षितिज ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
२००९ पासून आमदार क्षितिज ठाकूर हे नालासोपारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून ते इथले लोकप्रिय आमदार मानले जातात. येत्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यादांच मतदान करणारे तरुण मोठ्या प्रमाणावर आहेत. नालासोपाऱ्यातील तरुण देखील यावेळी मोठ्या प्रमाणावर रॅलीत सहभागी झाल्याचे यावेळी दिसून आले
What's Your Reaction?






