मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर:मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेची तथा ध्वजारोहणा संबंधी काळजीपूर्वक नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी संबंधित विभागास दिले.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी सिध्दार्थ उद्यान येथे होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या नियोजनाबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
गावडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी संबंधित विभागांनी कार्यक्रमस्थळी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर स्वातंत्रसैनिक, लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच ऐनवेळी उपस्थित राहणारे पाहुणे यांची व्यवस्था तसेच राजशिष्टाचाराप्रमाणे काळजी घेत आसन व्यवस्था करण्याचे निर्देशही गावडे यांनी संबंधितांना दिले.
What's Your Reaction?






