महाराष्ट्र : दोन आमदारांविरोधात आचार संहिता भंग केल्याबद्दल कारवाई

महाराष्ट्र : दोन आमदारांविरोधात आचार संहिता भंग केल्याबद्दल कारवाई

मुंबई : महाराष्ट्रात दोन आमदारांना आचार संहिता भंग केल्याबद्दल कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यात शिंदे गटाचे एक आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध हिंगोलीत आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुण्यात आचार संहिता भंगी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे. या दोन्ही प्रकारणांविषयी चौकशी करण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कलमुनरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संतोष बांगर यांनी एका सभेतील भाषणात तत्यांनी सांगितले की मतदारांना फोन पे वर पैसे देऊन मतदानासाठी घेऊन या. या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांनी तक्रार केल्यानंतर याच आधारावर निवडणूक आयोगाच्या टीमने कलमपुरी पोलीस स्टेशनमध्ये संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तसेच पुण्याच्या कसब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटण्याचे किट वाटले होते  नंतर याची तक्रार भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली होती. यांनतर निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या दोन्ही प्रकरणाची चौकशी स्थानिक पोलीस करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow