ठाणे : सिंचनापासून ते पायाभूत सुविधापर्यंत, उद्योगापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत, तरुणापासून ते ज्येष्ठांपर्यंत, परदेशी गुंतवणूकीपासून ते झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंत अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ, विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, निरंजन डावखरे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार गणेश नाईक, संजय केळकर, प्रताप सरनाईक, किसन कथोरे, कुमार आयलानी, विश्वनाथ भोईर, तसेच आमदार श्रीमती मंदा म्हात्रे, गीता जैन आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे जिल्ह्यातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, अमृताहूनही गोड असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत ते म्हणाले, आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा आहे. प्रधानमंत्री श्री.मोदी हे विश्वास, गती आणि प्रगती या तत्त्वावर विश्वास ठेवतात, त्यामुळे आज विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असून आजच्या दिवशी इंटरनल मेट्रो 29 कि.मी. ची सेवा सुरु होणार आहे. ठाण्याची वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ठाणे महापालिकेच्या इमारतीची पायाभरणी होत आहे. सध्याच्या फ्री वे ला छेडानगर ते ठाण्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे. ठाणे ते मुंबई प्रवास वेगवान होणार आहे. नवी मुंबई विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. सिडकोच्या नैना प्रकल्पात देखील मोठी पायाभूत सुरु आहे. सिडकोची ही टाऊनशिप मुंबईची शान वाढविणारी ठरणार आहे. प्रधानमंत्री यांच्या हस्ते ज्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन होते, ते सर्व प्रकल्प पूर्ण होतात. आज ज्या प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे, त्या सर्व प्रकल्पांचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मेट्रो 3 चा पहिला टप्पा तसेच इतर विकास प्रकल्प यापूर्वी थांबविण्यात आले होते. त्या सर्व प्रकल्पांना या सरकारने चालना दिलेली आहे. मेट्रो 3 चा बीकेसी ते कुलाबा हा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार असून अटल सेतू, कोस्टल रोड असे मोठमोठे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. आज शुभारंभ झालेल्या मेट्रो 3 च्या माध्यमातून 20 लाख ठाणे व मुंबईकर प्रवास करणार आहेत असे सांगून या प्रकल्पाला अर्थसहाय्य दिलेल्या जपानच्या जायकाचे (Japanese International Co-opreration Agency) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी पैठणी शाल, महाराष्ट्राची ओळख असलेला पैठणी फेटा तसेच ठाण्यातील श्री कोपिनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची प्रतिकृती व ठाण्याच्या दुर्गेश्वरी मातेची प्रतिमा देवून स्वागत केले.
महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर - मुख्यमंत्री
नवरात्रोत्सवानिमित्त मुंबई पोलीसांकडून 'निर्भया पथ...
मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी त्यांच्या निर्भया पथकातील शूर आणि समर्पित महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान केला. ...
भायंदर : अन्न विषबाधेची भीषण घटना — ३ वर्षांच्या म...
भायंदर : भायंदर पश्चिम येथे अन्नातून विषबाधा झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री झालेल्या या घटनेत केवळ ३ वर्षां...
मीरा-भाईंदरमध्ये डेंग्यूचा कहर, १० जणांचा संशयित म...
मीरा-भाईंदर:मीरा-भाईंदर शहरात पावसामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्याने आरोग्य धोक्यात आ...
गणेशोत्सव २०२५ : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक...
मुंबई – गणेशोत्सव २०२५ च्या आठव्या दिवशी, मुंबईतील सर्वात प्रसिद्ध गणपतीपैकी एक असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारो भक्तांनी लाल...
शिरगाव किल्ल्यावर स्वच्छता महाश्रमदान मोहिमेअंतर्ग...
शिरगाव : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आणि स्वच्छता महाश्रमदान मोहिमेच्या निमित्ताने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी शिरगाव येथे शिरगाव किल्ला ...
वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०...
वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४...
वसई-विरारमध्ये बेकायदेशीर बांधकामावर कारवाई; सहाय्...
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ :वसई-विरार शहर महानगरपालिका VVCMC ने बेकायदेशीर बांधकामावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, याचाच भाग म्ह...
वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म ६ व ७ ची दक्षिण बाज...
वसई, २९ ऑगस्ट : पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे की, वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ ...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
ठाणे : शाळांमधील इंग्रजी फलकावरून मनसेचा ठाणे महाप...
ठाणे : ठाणे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी फलक न लावण्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे ठाणे महानगरपालिके...
भिवंडीतील रंगाई युनिटला भीषण आग; सुदैवाने जीवितहान...
ठाणे, ६ सप्टेंबर २०२५ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कामतघर परिसरात एका एकमजली रंगाई युनिटला शुक्रवारी रा...
More Local News To You
Make every story matter—get news that resonates with you through your ABC Account.
गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा - नांदेड जिल्हाधिकारी
नांदेड: गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आ...
नायगाव मध्ये ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कॅंटीन चालकाकडून लैंगिक अत्याचार
मुंबईः बदलापूर येथील एक शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार ...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अश्विनी भिडे आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव
मुंबई - आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांना...
Previous
Article