मुंबई, 15 जुलै 2025: मुंबईतील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएल यांनी मेट्रो लाईन 2A आणि 7 वर दररोज चालणाऱ्या फेऱ्यांची संख्या 284 वरून 305 पर्यंत वाढवली आहे. ही वाढ 8 जुलै रोजी झालेल्या 3.01 लाख प्रवाशांच्या विक्रमी प्रवासानंतर करण्यात आली आहे.

या सेवेसाठी 3 नवीन मेट्रो रेक चालू करण्यात आले आहेत, त्यामुळे आता एकूण 24 रेक कार्यरत आहेत. पीक अवरमध्ये ट्रेनची वेळ आता 6 मिनिटे 35 सेकंदांवरून 5 मिनिटे 50 सेकंदांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि मेट्रो कमिशनर डॉ. संजय मुखर्जी यांनी ही सुधारणा ‘मुंबई इन मिनिट्स’ या दूरदृष्टीने प्रेरित असल्याचे सांगितले.