शास्त्रीनगरमधील अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेची कारवाई

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली

शास्त्रीनगरमधील अनधिकृत बांधकामावर ठाणे महापालिकेची कारवाई

ठाणे, 14 जुलै 2025: शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार लोकमान्य सावरकरनगर प्रभागातील शास्त्रीनगर नाल्याजवळ सुरू असलेल्या अनधिकृत चार गाळ्यांचे बांधकाम पूर्णतः निष्कसित करण्यात आले आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या तपासणीत, शास्त्रीनगर परिसरात विट-सिमेंटचे आठ पिलर, त्याखालील सिमेंटचा कोबा, तसेच गाळ्यांसाठी उभारलेले पाच भिंतींचे बांधकाम हे सर्व नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आले. सदर बांधकाम JCB मशीन व मनुष्यबळाच्या साहाय्याने हटवण्यात आले.

ही कारवाई उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवायांना वेग दिला जाणार आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम आढळल्यास तात्काळ कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

संपर्क:
ठाणे महापालिका, माहिती व जनसंपर्क विभाग
फोन: 022-25364779
वेबसाईट: www.thanecity.gov.in
ईमेल: publicrelationtmc@gmail.com
ट्विटर: @TMCaTweetAway
इंस्टाग्राम: @smartcity_thane
आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow