EVM विरोधात महाविकास आघाडी आंदोलन छेडणार

EVM विरोधात महाविकास आघाडी आंदोलन छेडणार

मुंबई - गेल्या आठवड्यातील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने ऐतिहासिक कौल जनतेने दिला. पराभूत झालेल्या महाविकास आघाडी (MVA) ने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (EVM) विश्वासार्हते विरोधात राष्ट्रीय आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी, ज्यामध्ये शिवसेना (उद्धव गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाविष्ट आहेत. 

भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेतृत्वाखालील महायुतीने 288 सदस्यीय विधानसभेत 230 जागा जिंकून विजय मिळवला. ज्यात भाजपने १३२ जागा जिंकून आपला सर्वकालिक सर्वोच्च निकाल नोंदवलातर महविकास आघाडीला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने मतदान यंत्रांना जबाबदार धरत आरोप केले आहेत आणि निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे नेते  विशेषत: उद्धव ठाकरे आणि शरद पवार, आता मतदान पत्रांच्या निवडणूक प्रक्रियेची मागणी करत आहेत, जजी निवडणूक प्रक्रिया काही देशांमध्ये जसे अमेरिकेत वापरली जाते. विरोधकांनी यापूर्वी देखील EVM विरोधात आवाज उठवला होता, विशेषत: हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या अनपेक्षित निकालानंतर.

निवडणूक आयोगाने या आरोपांनाही "निरर्थक" म्हणून फेटाळले असून भाजप नेत्यांनी EVM च्या वापराचे जोरदार समर्थन  केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "काँग्रेसला झारखंडमध्ये विजय मिळाला तेव्हा EVM च्या बाबतीत काहीच समस्या नव्हती." EVM संदर्भातील वाद भारतीय निवडणुकांमध्ये नवीन नाही, मात्र सध्या विरोधकांकडून सातत्याने मशीनच्या सत्यतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow