माहीम मतदारसंघात मनसे विरुद्ध शिवसेना ( ठाकरे गट )

माहीम मतदारसंघात  मनसे विरुद्ध शिवसेना ( ठाकरे गट )

मुंबई : सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून उमेदवारांची घोषणा करण्यासाठी राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. राज्यातील काही मतदारसंघ असे आहेत जिथे राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे रिंगणात उतरले आहेत तर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. महेश सावंत यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. माहीम मतदारसंघावर भगवा फडकलाच पाहिजे असा आदेश यावेळी उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना दिला.

माहीम, प्रभादेवी, दादर, परळ हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे इथून विजय संपादन करण्याचा निश्चय उद्धव ठाकरे गटाने केला आहे. महेश सावंत हे १९९० पासून शिवसेनेत सक्रिय असून, पक्षाच्या उपक्रमात, आंदोलने आणि सामाजिक उपक्रमांमध्ये मोठा सहभाग असतो त्यामुळे या भागात त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. मनसेने अमित ठाकरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. राज ठाकरे यांचा देखील या मतदारसंघावर प्रभाव आहे. निवडणुकीत मतदार कोणत्या पक्षाला कौल देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow