मीरा-भाईंदर वसई - विरारमध्ये महिला असुरक्षितच:इंस्टाग्राम ठरले गुन्ह्यांचे केंद्र

मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलिस आयुक्तालय परिसरात महिलां असुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली असता महिला अत्याचारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दाखल होणाऱ्या गुन्ह्यां च्या संख्ये च्या तुलनेत न दाखल होणारे कितीतरी गुन्हे असतील जे पोलीस ठाण्यापर्यंत काही कारणांमुळे पोहोचत नाहीत. अधिक माहितीनुसार, गेल्या आठ महिन्यांत येथे २२६ महिलांवरील बलात्काराच्या घटना तर १९७ महिलांची छेडछाड तर २७४ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले.महिलांवरील गुन्ह्यांची आकडेवारी
नोंदणीकृत प्रकरणे कन्विक्शन बलात्कार १०५ शिक्षा १०४,
बलात्कार अल्पवयीन(पोक्सो) १२१ शिक्षा ११९ , अपहरण (अल्पवयीन) २७४ शिक्षा २३२, देह व्यापार २९ शिक्षा २९, विनयभंग १९७ शिक्षा १८५,
छेड छाड १९७ शिक्षा १८५,
छेड छाड(पोक्सो)७९ शिक्षा ७६ ही सर्व प्रकरणे जानेवारी ते ३१ ऑगस्ट दरम्यानची आहेत.
विविध पोलीस ठाण्यात १९७ महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच २७४ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची प्रकरणे समोर आली आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहेत. त्यानंतरही असे गुन्हे कमी होत नाहीत. जवळपास सर्वच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
गंभीर बाब म्हणजे आठ महिन्यांत २२६ महिलांवर बलात्कार झाले, त्यापैकी १२१ अल्पवयीन आहेत.
वसई-विरारमधील वाढती गुन्हेगारी पाहता, वसई-विरारला पालघर पोलिसांपासून वेगळे करून मीरा-भाईंदर आणि वसई-विरार आयुक्तालयाशी संलग्न करण्यात आले. गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. त्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी वसई-विरारमध्ये आचोळे, मांडवी, पेल्हार आणि नायगाव ही चार नवीन पोलिस ठाणी स्थापन केली. आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर काही वर्षे गुन्हेगारी निश्चितच कमी झाली. मात्र गेल्या दोन वर्षांत गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढला आहे. विशेषत: येथील महिलांना असुरक्षित असल्याचे अधोरेखित झालेले आहे.
आठ महिन्यांत विनयभंगाचे २७६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ७९ प्रकरणे पॉक्सोशी संबंधित आहेत. उर्वरित गुन्हे महिलांची छेडछाड, पाठलाग, अश्लील कृत्य, विनयभंग, अश्लील मेसेज पाठवणे आदी कलमान्वये नोंदविण्यात आले आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे पोलिस प्रशासनाकडून माहिती मिळाली.
फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप
या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढली. सोशल मीडियाची ही माध्यमे तरुण पिढीमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. इंस्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक गुन्हे घडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. २०२१ मध्ये ४१४ तर २०२२ मध्ये ५४६ प्रकरणे विनयभंगाची नोंद झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीतून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. दरवर्षी यात वाढच होत आहे.
बलात्काराच्या बहुतांश घटनांमध्ये आरोपी हे पीडितेचे ओळखीचे असतात. बलात्कार झालेल्या महिलांमध्ये बहुतांश अल्पवयीन मुली होत्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीतून बलात्कार, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये म्हटले आहे.
पोलिस आयुक्तालय परिसरात २२६ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी १०५ महिलांवरील बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे (पोक्सो) १२१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
What's Your Reaction?






