मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून , निवडणूक कर्मचारी आणि जनतेला प्रवास  सुलभ होण्यासाठी दि. १९ आणि २० नोव्हेंबर २०२४ (मंगळवार-बुधवार रात्री) आणि दि. २० आणि २१ नोव्हेंबर २०२४ (बुधवार-गुरुवार रात्री) विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जाणार आहेत. 

या गाड्या  (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल) या मार्गांवर अप आणि डाऊन मार्गावर चालवल्या जाणार आहेत. 

विशेष उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक:

1. मंगळवार-बुधवार रात्री (दि. १९ आणि २० नोव्हेंबर , २०२४)

मेन लाईन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०३:०० वाजता सुटेल आणि  कल्याण येथे ४:३० वाजता पोहोचेल.

मेन लाईन (अप):
कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष: कल्याण येथून ०३:०० वाजता सुटेल आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४:३० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०३:०० वाजता सुटेल,  पनवेल येथे ०४:२० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन (अप):
पनवेल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष २: पनवेल येथून ०३:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे  ०४:२० वाजता पोहोचेल.
2. बुधवार-गुरुवार रात्री ( दि. २० आणि २१ नोव्हेंबर, २०२४)

मुख्य लाईन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१:१० वाजता सुटेल, कल्याण येथे ०२:४० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२:३० वाजता सुटेल, कल्याण येथे ०४:०० वाजता पोहोचेल.

मेन लाईन (अप):
कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल: कल्याण ०१:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे  ०२:३० वाजता पोहोचेल.
कल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष: कल्याण येथून ०२:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३:३० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन (डाऊन):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१:४० वाजता सुटेल, पनवेल येथे ०३:०० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल विशेष: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२:५० वाजता सुटेल, पनवेल येथे ४:१० वाजता पोहोचेल.

हार्बर लाइन (अप):
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल विशेष: पनवेल येथून ०१:०० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२:२० वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल स्पेशल: पनवेल येथून ०२:३० वाजता सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३:५० वाजता  पोहोचेल.

वर दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. तसेच या विशेष सेवांमुळे मतदारांना आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना एका स्थानकापासून ते दुसऱ्या स्थानकांपर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. मुख्यतः रात्रीच्या वेळेस मतदारांना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. या सुविधेमुळे मतदारांना आणि निवडणुक कर्मचाऱ्यांना प्रवास करणे सोयीचे होईल त्याचप्रमाणे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल अशी आशा मध्य रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.