शिवक्रांती जनरल कामगार संघटनेचा बहुजन विकास आघाडीला पाठींबा

शिवक्रांती जनरल कामगार संघटनेचा बहुजन विकास आघाडीला पाठींबा

वसई - शिवक्रांती जनरल कामगार संघटना व ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टने  बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीजजी ठाकूर व राजेश पाटील यांना आपला पाठींबा. आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 

वसई-विरारच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवक्रांती जनरल कामगार संघटना व ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टने बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र विधानसभा-२०२४ निवडणुकीत संस्थेचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक एकनिष्ठेने बहुजन विकास आघाडीसोबत काम करणार असून हितेंद्र ठाकूर, युवाआमदार क्षितीज ठाकूर व राजेश पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असा ठराव बैठकीत घेण्यात आला.  


हितेंद्रजी ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास 

हितेंद्रजी ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास असून मागील तीस वर्षात त्यांनी वसई-विरारला आर्थिक केंद्र बनवले आहे. त्याचसोबत हरीत वसईचे पर्यावरणही जपले आहे. युवा आमदार क्षितीज ठाकूर यांचा विकास आराखडा तालुक्याचा कायापालट नक्कीच करेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तालुक्याचा व तालुक्यातील नागरिकांचा विकास साधायचा असेल तर बहुजन विकास आघाडीशिवाय पर्याय नसून नागरिकांनी शिट्टी या चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी बहुजन विकास आघाडीच्या तीनही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन शिवक्रांती जनरल कामगार संघटनेकडून करण्यात आलेले आहे.

आज वसई येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना पाठींब्याचे पत्र दिले.त्यावेळी माजी महापौर नारायण मानकर, माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधव, प्रकाश वनमाळी, परिवहन समिती सदस्य अमित वैद्य यांच्या सह  शिवक्रांती जनरल कामगार संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रथमेश विचारे, सदस्य पियुष शेट, भाऊ पाटील,परशुराम भोईर,भावेश शहा, हेमंत घाग आदी मान्यवर उपस्थित होते.

मतदानाला अगदी काही दिवसच शिल्लक राहिलेले असतानाच मागच्या काही दिवसांपासून अनेक संघटनांकडून बहुजन विकास आघाडीला पाठींबा दिला जात असून पालघर जिल्ह्यातील आगरी कोळी संघटना, कुणबी सेना या संघटनांसोबतच इतरही अनेक संघटनांनी विकासासाठी तसेच आ. हितेंद्र ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळे विधानसभा निवडणुकींसाठी पाठींबा दिलेला आहे. यामुळे बविआची पालघर जिल्ह्यातील ताकद आणखीन वाढत असून विरोधी पक्षांसाठी हा धक्का असल्याचे बोलले जाते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow