भाजप जिल्हा सचिव राजन पांडे यांच्यावर मीरा-भाईंदरमध्ये प्राणघातक हल्ला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

भाजप जिल्हा सचिव राजन पांडे यांच्यावर मीरा-भाईंदरमध्ये प्राणघातक हल्ला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे जिल्हा सचिव राजन पांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यात पांडे गंभीरपणे जखमी झाले असून, हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी अवस्थेतील पांडे यांना तातडीने मिरारोड येथील वॉकार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती अशी आहे की, भाईंदर पश्चिमेतील शिवसेना गल्लीत हा हल्ला झाला. राजन पांडे हे भाजपचे स्थानिक नेते रवी व्यास यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. प्रारंभिक तपासानुसार, हा हल्ला अंतर्गत वादातून झाला असल्याचा संशय आहे. हल्लेखोराचे नाव विनोद राजभर असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही तरुण राजन पांडे यांना घेरून धारधार शस्त्रांनी हल्ला करताना दिसत आहेत, तर एक महिला त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओ स्थानिक मुलीने आपल्या घराच्या खिडकीतून शूट केला असल्याचे समजते.

या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या हल्ल्याच्या मागील कारणांचा शोध घेतला जात आहे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow