मुंबई-अहमदाबाद हायवे काँक्रीटीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी नितीन गडकरींचे कंत्राटदारांना आदेश

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरणासह काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तसेच कामाची गुणवत्ता राखण्याचे आदेश केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच गुवत्तेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा 121 किमीच्या मार्गावर काँक्रीटीकरणाचे काम डिसेंबर २०२३ पासून सुरु झाले आहे. मात्र या कामामुळे वाहतूक समस्या वाढल्या असून वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळ वाया जात आहे. या प्रकल्पामुळे होणाऱ्या वाहतूक समस्यांबाबत आणि गुणवत्तेच्या मुद्द्यांवर स्थानिक खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली.
वाहतूक समस्या आणि गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह
काही ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावरील काँक्रीट निघून जाण्याच्या तक्रारी आहेत. रस्त्याचा पातळी असमान असल्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत.
नव्याने बांधलेल्या रस्त्यांच्या आजूबाजूला खड्डे, फ्लायओव्हरवरचे लाइट बंद, निकृष्ठ सर्व्हिस रोड, वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांबद्दलही तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. गडकरी यांनी या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 121 किमी पैकी 81 किमीचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे.
उर्वरित काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. सध्या 6 ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विशेष निरीक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






