मुंबई - आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या ब्रिजेश सिंह यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील.

अश्विनी भिडे यांना पदाचा कार्यभार त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. तसंच पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

आश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील २५ वर्षांचा आहे. मुंबई मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना मुंबई मेट्रो वुमन म्हणून देखील ओळखले जाते. आता त्यांची बदली करण्यात आली असून, त्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाचा पदभरा सांभाळणार आहेत.