मोबाईल सिम कार्ड काढण्याची पिन महिलेच्या तोंडातून फुफ्फुसात अडकलीः वैद्यकीय टीम पिन काढण्यात यश

मोबाईल सिम कार्ड काढण्याची पिन महिलेच्या तोंडातून फुफ्फुसात अडकलीः वैद्यकीय टीम पिन काढण्यात यश

मुंबईः मोबाईलचे सिम कार्ड काढण्याच्या नादात तोंडात ठेवलेली पिन श्वसन नलिकेतून  फुफ्फुसाच्या एका कोप-यात अडकून पडलेल्या महिलेवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन बाहेर काढली.

            रत्नागिरी येथील एका २३ वर्षीय महिलेने  आपल्या मोबाईलचे सिम बदलतांना सिम कार्ड बदलण्याची पिन तोंडात ठेवलेली.  तेव्हा चूकून त्या महिलेने ती सिम कार्डची पिन गिळली. त्यावेळेस तिला श्वासोश्वासाला किंवा गिळायला काही त्रास होत नव्हता म्हणून ती रात्री डॉक्टरांकडे न जाता घरीच राहिली.ही घटना वीस ऑगस्टला घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथे सर्जन डॉ. रविद्रं गोंधळेकर यांना दाखवले. तेव्हा त्यानी अन्ननलिकेची स्कोपी केली पण त्यांना ती पिन दिसली नाही नंतर त्यांनी छातीचा एक्स- रे  व   सिटी  स्कॅन केला. त्यामध्ये त्यांना  उजव्या बाजूच्या श्वासन नलिकेत पिन दिसली. डॉ. गोंधळेकर यांनी लगेच त्या महिलेला वालावलकर रुग्णालयात जाण्यास सांगितले. वालावलकर रुग्णालयामधे येताच महिलेला वालावलकर रुग्णालयाचे ई. एन. टी  सर्जन डॉ. राजीव केणी यांनी   तपासले व नातेवाइकांना तात्काळ ऑपरेशन करून सिम कार्डचे पिन श्वसनलिकेतून काढण्याचा सल्ला दिला. नातेवाईकानी क्षणाचा विलंब न करता वालावलकर हॉस्पीटलच्या कान ,नाक ,घसा तज्ञांवर विश्वास ठेवून ऑपरेशनची तयारी दाखवली. डॉ. राजीव केणी यांनी अत्यंत कुशलतेने ब्रोन्कोस्कोपी करून उजव्या फुफ्फुसाच्या श्वासनलिकेत अडकलेली सिम कार्डची पिन बाहेर काढली. अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया सहजरित्या झाल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. ब्रोन्कोस्कोपी ही शस्त्रक्रिया अवघड यांच कारणासाठी आहे. यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका असतो. तसेच भूल देणे खूप कठीण असते. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow