राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी:शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी:शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून प्रचारासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच देशातील दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात होत आहेत. प्रशासकीय निवडणूक यंत्रणांवरही निवडणुकीच्या कामांची जबाबदारी आहे.

शाळेतील शिक्षक निवडणूक ड्युटीवर

मतदानासाठी अनेक यंत्रणांची मदत निवडणूक आयोग घेत असतं. यासाठी शाळेतील शिक्षकांवर देखील जबाबदारी असते. यासाठी मतदानाच्या आधीच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातली शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे अनेक शाळांना शाळा चालविणे 18 19 आणि 20 नोव्हेंबरला अशक्य असल्याने ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे, त्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 18, 19,20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याची सूचना देण्याचे आदेश राज्य सरकारचे उपसचिव तुषार महाजन यांच्या पत्राद्वारे शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत

निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तीन दिवस शाळा भरवणे कठीण जाणार आहे. याशिवाय अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रची व्यवस्था करण्यात येते. या सगळ्याचा विचार करून 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या तीन दिवशी ज्या शाळांना शाळा भरवणे शक्य नसेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow