गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू: नालासोपार्‍याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ झाला होता

गोव्याच्या धर्तीवर वसई समुद्रात आरामदायी पार्टी क्रूझ सुरू: नालासोपार्‍याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या फेरीचा शुभारंभ झाला होता

वसई: गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आता आरामदायी समुद्र सफारीचा (लक्झरी क्रुझचा) आनंद घेता येणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई-भाईंदर खाडीत सुरू असलेल्या रोरो सेवे अंतर्गत मेजवानी बोट सफर सुरू केली आहे. आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या पार्टी क्रुझचं शुभारंभ करण्यात आला होता. एक तासांच्या या सफरीत नृत्य, संगीताच्या तालावर समुद्र सफरीचा आनंद घेता येणार आहे. 

वसई आणि भाईंदर खाडी दरम्यान फेब्रुवारी महिन्यापासून रोरो सेवा सुरू करण्यात आली होती. या रोरो सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वसईहून भाईंदर मार्गे मुंबईला जाणे सोपे झाल्याने नागरिक रोरो सेवेला पसंदी देत आहे. या प्रतिसादामुळे खाडीत आरामदायी पार्टी क्रुझ सुरू करण्यास परवानगी दिली होती. नालासोपार्‍याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या फेरी की सवारीचा शुभारंभ करण्यात आला होता. या पार्टी क्रुझमुळे वसईच्या पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास आमदार क्षितीज ठाकूर यांनी व्यक्त केला. 

अशी आहे ‘फेरी की सवारी’
या पार्टी क्रुझ बाबत माहिती देताना संचालिका सुयशा तांबोरे यांनी सांगितले की, वाढदिवस, कोटुंबिक सोहळे, मेजवान्या आदींसाठी ही ‘पार्टी क्रुझ’ तयार करण्यात आली आहे. दिवसातून या फेरी की सवारीच्या एकूण तीन फेर्‍या असणार आहे. संध्याकाळी भाईंदरवर ४ ते ५ या कालावधीत एक फेरी असेल. तर वसई ते भाईंदर अशी संध्याकाळी ५:३० ते ६:३० आणि ६:३० ते ७:३० अशा दोन फेर्‍या असतील. प्रत्येक फेरी ही १ तासांची असेल. या पार्टी क्रुझ मध्ये एकूण तीन भाग आहेत. खालील भाग (लो डेस्क) दिडशे रुपये प्रति माणसी ठेवण्यात आला आहे. मधला डेस्ट हा कुटुंबासाठी (फॅमिली सेक्शन) आहे. त्यात प्रत्येक ४ जणांसाठी १८०० रुपयांचा दर आहे. ज्यात ३०० रुपयांचा स्नॅक्स दिला जाणार आहे. वरील भाग हा प्रिमियर डेस्क आहे. ज्यात ४०० रुपये प्रति माणसी असा दर आहे. ज्या मध्ये प्रत्येकाला १०० रुपयांचे स्नॅक्स दिले जाणार आहे. ज्याला पुर्ण डेस्क हवा असेल त्याला २५ माणसांचे आगाऊ नोंदणी करावी लागत आहे. या मेजवानी बोर्टीत संगीत, डिजे, नृत्य आकर्षक रोषणाई करण्यात येत आहे.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow