सुर्या प्रकल्पातील अतिरिक्त १६५ दशलक्ष पाणी

सुर्या प्रकल्पातील अतिरिक्त १६५ दशलक्ष पाणी

वसई- वसई विरार शहरासाठी एमएमआरडीएच्या सुर्या प्रकल्पातील योजनेतून १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे पालिकेने नळ जोडण्यांचा देण्याच्या कामाला गती दिली आहे. पालिकेने एकूण ३ हजार ६९५ नवीन नळ जोडण्या मंजूर केल्या असून त्यापैकी २ हजार ८५१ नळजोण्या पूर्ण झाल्या आहेत. 

वसई विरार शहराला सुर्या, उसगाव व पेल्हार या तिन्ही धरणातून  २३१ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा प्रतिदिन केला जात होता. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत होती आहे. मर्यादीत पाणी पुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने महापालिकेला नवीन नळ जोडण्या देण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पाण्याचा पुरवठा वाढल्याने नळजोडण्या देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता बहुतांश नळजोडण्या देण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे. पालिकेने एकूण ३ हजार ६९५ नळ जोड्ण्या मंजूर केल्या असून त्यापैकी २ हजार ८५१ नळजोण्या पूर्ण झाल्या आहेत. बहुतांंश मागणी असलेल्या नळजोडण्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

सुर्या प्रकल्पातून अतिरिक्त १६५ दशलक्ष लिटर्स पाणी
वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यातून २०० दशलक्ष लिटर्स, पेल्हार धरणातून १० दशलक्ष आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर्स असा एकूण २३० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता. एमएमआरडीएकडून आलेले अतिरिक्त १८५ दशलक्ष लिटर्स पाणी शहरांतर्गत वितऱणासाठी पालिकेने रुपये १३९ कोटींची योजना तयार केली आहे. आता शहराला १६५ दशलक्ष लिटर्स पाणी मिळू लागले आहे. त्यामुळे शहराला एकूण ३९६ दशलक्ष लिटर्स पाणी पुऱवठा सुरू झाला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow