वसईच्या प्रवेशद्वारावर उभा राहणार चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा

वसईच्या प्रवेशद्वारावर उभा राहणार चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा

वसई- वसईची ऐतिहासिक ओळख असलेल्या चिमाजी आप्पांचा अश्वारूढ पुतळा वसईच्या प्रवेशद्वारावर उभा राहणार आहे. पालिकेने प्रकल्पाच्या ५ कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून नुकतेच त्याचे भूमीपुजन करण्यात आले.

नरवीर चिमाजी अप्पा ही वसईची ओळख आहे. पोर्तुगीजांवर विजय मिळवून चिमाजी अप्पांनी वसई जिंकली होती. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी वसईच्या प्रवेशद्वारावर त्यांचा पुतळा उभारण्याा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापूर्वी २०२७ मध्ये नवघर माणिकपूर नगरपरिषदेने वसईच्या प्रवेशद्वारावर अंबाडी रोड येथे नरवीर चिमाजी आप्पा यांचा फायबर चा पुतळा उभारला होता तसेच त्याचवेळी नवघर स्मशानभूमीचे काम ही केले होते. त्याच ठिकाणी आता नव्याने नरवीर चिमाजी आप्पा यांचा धातूचा अश्वरूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचा खर्च २ कोटी असून परिसरातचे सुभोभिकरण केले जाणार आगे. त्यात त्यासाठी आणखी ३ कोटींचा खर्च येणार आहे. चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा आणि परिसराचा विकास असा हा एकूण ५ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. नुकताच या कामाचा शुभारंभ नालासोपार्‍याचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला. 

या कार्यक्रमासाठी माजी महापौर नारायण मानकर,रुपेश जाधव,माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रीक्स ,परिवहन समिती माजी सभापती भरत गुप्ता, वृंदेश पाटील, निलेश देशमुख ,डॉमनिक मिनेझिस आदी मान्यवर उपस्थित होेते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow