आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचं वक्तव्य ‘बूमरँग` ठरलं! उद्या होणाऱ्या मॅरॅथॉनला राजकीय रंग

विरार : वसई-विरार महापालिकेच्या कार्यक्रमांत राजकीय अजेंडा नसावा, अशी अपेक्षा नवनिर्वाचित भाजप आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. आम्ही याची काळजी घेऊ तुम्हीही याची काळजी घ्या असे त्या महापालिका प्रशासनाला उद्देशून म्हणाल्या होत्या. तसेच महापालिकेचे उपक्रम अराजकीय असावेत, अशी त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेवर राजकीय "रंग' चढल्याचे दिसून येत आहे.
उद्या (8 डिसेंबर) होणाऱ्या ‘वसई-विरार मॅरॅथॉन स्पर्धेनिमित्ताने शहरभरात उभारण्यात आलेल्या स्टॉल्स आणि झाडांच्या बुंध्यांना भगवा रंग मारण्यात आल्याने आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचं वक्तव्य ‘बूमरँग` ठरलं आहे.
वसई-विरार विधानसभा निवडणुकीत राजकीय सत्तापरिवर्तन घडल्याने वसई-विरार मॅरॅथॉन स्पर्धा-2024 विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत या स्पर्धेवर बहुजन विकास आघाडीचा प्रभाव होता. यंदा राजकीय सत्तापरिर्वतानाच्या सोबत मॅरॅथॉन स्पर्धेतील रंगांचंही परिवर्तन घडेल, अशी अपेक्षा होती. दोनच दिवसांपूर्वी वसईच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी नवघर-माणिकपूर विभागाच्या कला-क्रीडा महोत्सवात अतिथी म्हणून बोलताना तशी अपेक्षा व्यक्त केलेली होती. त्यांच्या या व्यक्तव्याची वसई-विरार महापालिका दखल घेईल, अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र वसई-विरार महापालिकेने शहरातील अनेक स्टॉल्स आणि झाडांच्या बुंध्यांना भगव्या रंगाने रंगवून स्पर्धेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्नेहा दुबे यांनी महापालिकेचे कार्यक्रम अराजकीय असावेत अशी सूचना केली होते मात्र आता मॅरेथॉनला राजकीय रंग प्राप्त झाल्याने त्यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित होत आहे.
What's Your Reaction?






