वसई कला क्रीडा महोत्सव : रंगावली प्रदर्शनाला कलाप्रेमींची पसंती
कला क्रीडा महोत्सवात रंगावली प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी प्रदर्शन पाहायला मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. या साठी वसईच्या न्यू इंग्लिश स्कुल येथे लाबंच लांब रांगा पाहायला मिळाल्या. रंगावली स्पर्धेतून स्पर्धकांना एक मोठे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध होऊन नागरिकांचे कौतुक सुद्धा स्पर्धकांना यावेळी अनुभवता येते.

वसई - यंग स्टार ट्रस्ट विरार, वसई विरार शहर महानगरपालिका तसेच वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ यांच्या सहकार्याने दरवर्षी वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा या महोत्सवाचे ३५ वर्ष असून यात विविध कला आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ५५ हजार स्पर्धकांनी या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे. यातील रंगावली स्पर्धा ही वसईकरांमध्ये विशेष लोकप्रिय असून दरवर्षी प्रमाणे यंदाही कलाप्रेमींनी मोठ्या रांगा लावत रांगोळी कलेचा आस्वाद घेत आहेत.
कला विभागातील रंगावली स्पर्धेत दोन वयोगटातून अनेक कलाकार सहभागी झाले होते. यात कणा, भौमितिक, व्यक्तिचित्र, निसर्ग, 3D सदृश्य अशा विषयांवर कलाकारांनी रांगोळ्या रेखाटल्या आहेत. यामध्ये व्यक्तिचित्र या विषयावर रेखाटलेल्या काही रांगोळ्या कलप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. यात चेस या खेळात उत्कृष्ट कामगिरी करणारा गुकेश, पैरालंपिक स्पर्धेत पदक जिंकणारी शीतल देवी यांची रांगोळी रेखाटली आहे. तर रतन टाटा, झाकीर हुसेन यांचेही रांगोळीच्या माध्यमातून स्मरण करण्यात आले आहे. मराठी सिनेमा आणि नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यावरील रांगोळ्या आकर्षक पद्धतीने रेखाटण्यात आल्या आहेत. पुष्पा २ या चित्रपटातील नायक पुष्पा याची देखील रांगोळी या प्रदर्शनात पाहता येणार आहे. निसर्ग या विषयावर देखील उत्कृष्ट रांगोळ्या स्पर्धकांनी रेखाटल्या आहेत.
कला क्रीडा महोत्सवात रंगावली प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी प्रदर्शन पाहायला मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. या साठी वसईच्या न्यू इंग्लिश स्कुल येथे लाबंच लांब रांगा पाहायला मिळाल्या. रंगावली स्पर्धेतून स्पर्धकांना एक मोठे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध होऊन नागरिकांचे कौतुक सुद्धा स्पर्धकांना यावेळी अनुभवता येते.
What's Your Reaction?