वसई: घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला माणिकपूर पोलिसांकडून अटक
घरफोडी करणारा आरोपी सन्नी सुनिल निवाते हा सराईत चोर असून त्याच्यावर या आधीही नालासोपाऱ्याच्या आचोळा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत ३ गुन्हे दाखल आहेत. माणिकपूर पोलिसाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करत आरोपीला अटक केली आहे.

वसई - घरफोडी करून पळून गेलेल्या सराईत चोराला पकडण्यास माणिकपूर पोलिसाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. वसई पश्चिमेच्या बाभोळा परिसरात १३ डिसेंबर रोजी कौल हेरिटेज सिटी येथील कमलेश तावडे यांच्या घरात अज्ञात चोराने खिडकीतून प्रवेश करून चोरी केली होती. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदार यांनी १०० सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आरोपी सन्नी सुनिल निवाते (२७) याला वसईच्या स्टेला येथून अटक करण्यात आली. आरोपीने चोरी केलेले सोन्याचे दागिने, महागडी घड्याळे असा एकूण साडे आठ लाख किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीवर माणिकपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३३१ (४) व ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हा सराईत चोर असून त्याच्यावर या आधीही नालासोपाऱ्याच्या आचोळा पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत ३ गुन्हे दाखल आहेत.
मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक (गुन्हे) बालाजी दहिफळे यांच्या मार्गर्दर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करून आरोपीला अटक करण्यात आली.
What's Your Reaction?






