वसई - पेल्हारमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई

वसई - पेल्हारमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई

वसई - काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यातील आचोळे येथे अनधिकृत इमारतींवर वसई- विरार शहर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली त्यानंतर बुधवारी नालासोपारा पूर्वेच्या प्रभाग समिती (एफ) अंतर्गत गाव मौजे पेल्हार येथील रिचर्ड कंपाउंड येथे  उभारण्यात आलेल्या अनधिकृत औद्योगिक गाळ्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. सदर कारवाईत 15 हजार चौरस फुटांचे बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले आहे

पालिका आयुक्त अनिलकुमार पवार व अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या आदेशानुसार, उपयुक्त दीपक सांवत यांच्या नेतृत्वाखाली ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनधिकृत बांधकाम सुरूच आहेत विशेषतः वसई आणि नालासोपारा पूर्वेच्या भागात अनधिकृत बांधकाम प्रकरणात अधिकच वाढ होऊ लागली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केलेल्या या कारवाईत 15 हजार चौरस फुटांचे बारा गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow