धक्कादायक ! मुंबईत ५६ वर्षीय नराधमकडून १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

धक्कादायक ! मुंबईत ५६ वर्षीय नराधमकडून १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार

मुंबई - मोबाईलमधील ऑडिओ किल्पवरून ब्लँकमेल करत एका ५६ वर्षीय नराधमाने १४ वर्षाच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला अंधेरी येथील डीएन पोलिसांनी अटक केली असून या नराधमाला मदत करणाऱ्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांवरही पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मित्रांसोबतच्या संवादाचे चित्रिकरण करून कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देऊन ५६ वर्षीय व्यक्तीनं १४ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना मुंबईत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचार करणाऱ्या आरोपीने पीडित मुलीला मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्यासोबत बोलतानाचा व्हिडिओ करत कुटुंबियांना दाखवेन अशी धमकी देत पीडित मुलीस आरोपीने घाबरवले.ते चित्रीकरण पीडित मुलीला दाखवून तिच्या पालकांना याबाबत सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, मुंबईत महिला अत्याचाराच्या घटनात वाढ झाली असून यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow