वसई टर्मिनसचा 2018 मधील प्रकल्प का अपूर्ण राहिला ? आम आदमी पक्षाचा प्रशासनाला सवाल

वसई-वसई रेल्वे स्थानकात रेल्वे टर्मिनस उभारण्याची घोषणा करण्यात आली असून सध्या त्याचा गाजावाजा भाजपाकडून केला जात आहे मात्र 2018 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या टर्मिनसची घोषणा केली होती. या घोषणेनंतर हे काम का पूर्ण झाले नाही असा सवाल आता आम आदमी पक्षाने प्रशासनाला केला आहे.
काय आहे 2018 ची प्रकल्प घोषणा ?
2018 साली तत्कालीन रेलवेमंत्री पियुष गोयल यांनी वसई टर्मिनसची घोषणा केली होती तसेच हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यांनतर मागील पाच वर्षात नव्या टर्मिनससाठी कोणतेही काम सुरु करण्यात आले नव्हते.
नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी
नुकताच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वसई रोड रेल्वे स्थानकात रेल्वे टर्मिनस उभारण्याची घोषणा केली आहे. मात्र आधीच्या घोषणेचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करून आत्ताच्या प्रकल्पाचा नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
What's Your Reaction?






