दोन वर्षांपासून मिरा-भाईंदर पालिकेची वृक्षगणना कागदावरच

दोन वर्षांपासून मिरा-भाईंदर पालिकेची वृक्षगणना कागदावरच

मिरा-भाईंदर -मिरा-भाईंदर महानगरपालिकेने शहरात अस्तित्वात असलेल्या वृक्षांची भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे जीआयएस टॅगिंग गणना करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता मात्र या गोष्टीस आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला असला तरी प्रत्यक्ष कामात सुरुवात झालेली नाही. शहरात हरितपट्टा वाढावा आणि पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी पालिकेकडून शासनाच्या आदेशानुसार दर पाच वर्षांनी वृक्ष गणना केली जाते. 

याआधी २०१७ ला अशा प्रकारची वृक्ष गणना करण्यात आली होती. त्यावेळी शहरात साधारण सहा लाख वृक्ष असून 67% पट्टा हरित परिसराने व्यापलेला असल्याने स्पष्ट झाले होते. या वृक्ष गणनेला सात वर्षांचा कालावधी होऊन गेला तरीही दुसरी वृक्ष गणना झालेली नाही. 

महापालिकेने २०२३ मध्ये वृक्ष गणना करण्याचा निर्णय घेतला होता तसेच यासाठी ९ कोटी रुपये इतका निधी राखून ठेवला होता.  यात एका झाडाची तांत्रिक पद्धतीने गणना करण्यासाठी जवळपास 15 ते 20 रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला होता. मात्र, दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही वृक्ष गणना झाली नसल्याचे समोर आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow