वसई : निवडणूक संपताच रेल्वेचे घूमजाव, वसईकरांना ४ नव्हे फक्त २ रेल्वे उड्डाणपूल मिळणार

वसई : निवडणूक संपताच रेल्वेचे घूमजाव, वसईकरांना ४ नव्हे फक्त २ रेल्वे उड्डाणपूल मिळणार

वसई, २० फेब्रुवारी २०२५ - वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीला दोन वर्षांपासून घराघरात चर्चेचा विषय बनलेल्या रेल्वे उड्डाणपूलांचा मुद्दा निवडणुकांच्या घोषणांमध्ये जोरदार रेटला गेला. शहरातील ४ रेल्वे उड्डाणपूलांचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला होता, आणि या ४ उड्डाणपूलांचा मुद्दा निवडणुकांच्या प्रचारात प्रमुख ठरला होता. पण निवडणुकीचा धुर थांबला आणि प्रत्यक्षात वसईकरांना फक्त २ रेल्वे उड्डाणपूलच मिळणार आहेत.

वसई विरार शहराच्या वाहतूक कोंडीला सामोरे जाण्यासाठी ४ रेल्वे उड्डाणपूल तयार करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. पालिकेने शहराच्या चार प्रमुख भागांमध्ये उड्डाणपूल प्रस्तावित केले होते. यामध्ये अलकापुरी (नालासोपारा), ओस्वाल नगरी (नालासोपारा), विराट नगर (विरार) आणि उमेळमान (वसई) या चार ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे ठरले होते. यासाठी १५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता.

सत्तांतर झाल्यानंतर, वसईकरांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला. रेल्वे मंत्रालयाने एकाच वेळी फक्त २ उड्डाणपूलांना मंजुरी दिली. विशेषत: नालासोपारा येथील अलकापुरी आणि ओस्वाल नगरी यांठी दोन उड्डाणपूलांनाच मंजुरी मिळाली. त्याचवेळी, वळण घेत विराट नगर आणि उमेळमान येथील उड्डाणपूलांच्या निर्मितीसाठी नकार दिला गेला आहे.

रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्या भेटीदरम्यान पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी या ४ उड्डाणपूलांच्या कामांच्या संदर्भात पाठपुरावा केला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की, "अलकापुरी आणि ओस्वाल नगरी येथील रेल्वे उड्डाणपूलांना मंजुरी मिळवली आहे. त्यासाठी जिओ-टेक्निकल तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र, उमेळमान आणि विराट नगर येथील उड्डाणपूलांना सध्या मंजुरी दिली जाणार नाही."

वसई विरारच्या नागरिकांच्या अपेक्षांना धक्का लागला असला तरी, या दोन उड्डाणपूलांच्या कामाच्या संदर्भात पालिका आणि खासदारांनी पुढे जाण्याचे आश्वासन दिले आहे.

हे २ पूल मिळणार:
१) अलकापुरी- (वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)
२) ओस्वाल नगरी- (विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)

हे २ पूल मिळणार नाही:
१) विराट नगर- (विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान)
२) उमेळमान- (वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान)

वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीला सुटकारा मिळवण्यासाठी हे दोन्ही उड्डाणपूल महत्त्वपूर्ण ठरतील, परंतु उर्वरित दोन पूलांसाठी विशेष प्रयत्न चालू ठेवले जातील, असे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow