वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी वकिलांचे आंदोलन: सरकारी विलंबामुळे नाराजी

वसई: वसईच्या वकिलांनी २ सप्टेंबर २०२४ पासून न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी आणि त्यासाठी सरकारकडून जमीन मिळावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. विद्यमान न्यायालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने न्यायाधीश आणि पक्षकारांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. न्यायालयाच्या फाइलांसाठीही पुरेसा जागा नाही, त्यामुळे न्यायालयाचे कामकाज अडचणीत येत आहे.
वकिल संघाने मागील अनेक वर्षांपासून सुसज्ज इमारतीची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने सिटी सर्वे नंबर ३७६ मध्ये इमारत बांधण्यास मंजुरी दिली आहे, परंतु ही जमीन न्यायालयाच्या नावावर हस्तांतरित करण्यात सरकारी पातळीवर मोठा विलंब होत आहे. त्यामुळे वकिल संघाने सरकारकडे विनंती केली आहे की ही जमीन तातडीने न्यायालयाच्या नावावर हस्तांतरित करावी आणि न्यायालयाची सुसज्ज इमारत बांधावी.
वकिल संघाने न्यायाधीशांची संख्या वाढविण्याची आणि प्रलंबित प्रकरणांचा लवकर निपटारा करण्याचीही मागणी केली आहे. या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?






