वसई-वीरार शहरात कमी दाबाने होईल पाणीपुरवठा

वसई-वीरार शहरात कमी दाबाने होईल पाणीपुरवठा

वसई-विरार:वसई-विरार शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने परिपत्रक जारी केले आहे. नागरिकांना पालिकेशी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

वसई-विरार शहरातील पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एमएमआरडीएच्या सुर्या धरणाच्या पाणी पुरवठा योजनेतील कवडास पंपिंग स्टेशन आणि सूर्या नगर जलशुद्धीकरण केंद्र (कासा विक्रमगड) येथील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने मंगळवार, २५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता विजपुरवठा खंडित झाला. यामुळे एमएमआरडीएच्या योजनेतून १४० द.ल.ली. पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती किंवा बदलण्यासाठी ३ ते ४ दिवस लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेच्या सूर्या धरणाच्या नवीन आणि जुन्या योजनेतून होणारा २०० द.ल.ली. पाणी पुरवठा सुरळीत असला तरी एमएमआरडीएच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने, वसई-विरार शहरात पाणीपुरवठा मंगळवार २५ मार्च, २०२५ रोजी रात्रीपासून कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होईल.

पाणी पुरवठा विभागाचे उप आयुक्त समीर भूमकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, महापालिका क्षेत्रास होणारा पाणी पुरवठा अपुर्‍या व कमी दाबाने होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे आणि महापालिकेला सहकार्य करावे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow