सफाळे येथील माय फर्स्ट प्रीस्कूलचा ५ वा वार्षिक क्रीडा दिवस संपन्न

सफाळे : सफाळ्यातील माकणे येथील माय फर्स्ट प्रीस्कूलचा ५ वा क्रीडा दिवस नुकताच संपन्न झाला आहे. ४ ते ९ डिसेंबर या कालावधीत वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांनी एकूण ३८ पदके जिंकली. माय फर्स्ट प्रीस्कूल सफाळे पश्चिम येथे झालेल्या या कार्यक्रमात सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.
या क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, लंगडधाव, चमचा-लिंबू, बटाटा शर्यत, संगीत खुर्ची आणि सांघिकी खेळ यासह विविध खेळ आणि उपक्रम बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. लहान मुलांनी अतिशय उत्साहाने या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिहान राजू रायकर जे 7वे डॅन ब्लॅक बेल्ट, पालघर जिल्ह्याचे MMA (Mixed Martial Arts) चे अध्यक्ष आणि World REFREE MMA आहेत यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शिस्तीचे आणि खेळाचे महत्व या विषयावर त्यांनी भाषण देऊन विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षकांना प्रेरणा दिली.
मुख्यध्यापिका अंजली नाईक यांनी यावेळी विद्यार्थी, शिक्षकांचे तसेच इतर कर्मचाऱ्यांचे आणि पालकांचे देखील हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले. यासारख्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा विकास होतोच तसेच सगळे एकत्र आले तर आपण नक्कीच अधिक चांगले काम करू शकतो हे देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमातून शिकता येते. असेही त्या पुढे म्हणाल्या. कार्यक्रमाची सांगता पारितोषिक वितरण समारंभाने झाली.
What's Your Reaction?






