वसई : 'ख्रिसमस फिटनेस रन' ला उत्स्फूत प्रतिसाद

वसई - वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ, यंगस्टर ट्रस्ट आणि वसई विरार महानगरपालिका यांच्याकडून 'ख्रिसमस फिटनेस रन' चे आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमस सणाचे औचित्य साधून या विशेष रनचे आयोजन करण्यात आले होते. समाजात सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्तीचा संदेश पोहोचावा यासाठी या रनचे आयोजन करण्यात आले होते.
विरार ते नरवीर चिमाजी अप्पा मैदान, वसई या मार्गावर दुपारी ४ वाजता सुरु झालेल्या या फिटनेस रनला उत्स्फूत प्रतिसाद मिळाला. फिटनेस रन मध्ये ३० धावपट्टू आणि २५ सायकलस्वार सहभागी झाले होते. यात ६५ वर्षीय युजीसी कॉड्रोस या फिटनेस रनमध्ये सहभागी झाले होते. मागील काही वर्षांपासून ते यात सहभागी होऊन तंदुरुस्तीचा संदेश देतात. तर प्रतीक्षा चोरमले या यावर्षी पहिल्यांदाच या रनमध्ये सहभागी झाल्या होत्या.
यावेळी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास केलेले ज्यूड डिसोझा, सचिन कवळी, प्रणय राऊत ,तसेच लडाख खारदुंगला पास येथे प्रतिकूल हवामान परिस्थितीत ७२ किमी अल्ट्रा मॅरेथॉन रन पुर्ण करणारे स्वप्निल पाटील आणि जैसलमेर ते लोंगेवाला १८० किमीची बॉर्डर रेस २२ तासात पुर्ण करणारे प्रशांत चव्हाण उपस्थित होते. त्याचप्रमाणे फादर लिओ फरगॉस , माजी नगरसेवक मार्शल लोपीस, हे ही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमा मध्ये सार्थक दिब्रिटो आणि अंन्सी लोपोस यांनी ड्रॅम आणि ट्रम्पेड्वर ख्रिसमस साँगचा नजारा पेश करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी सार्थक दिब्रिटो आणि अंन्सी लोपीस यांनी ड्रॅम आणि ट्रम्पेड्वर ख्रिसमसची गाणी सादर केली. या कार्यक्रमासाठी वसई कला क्रीडा विकास मंडळाचे मकरंद सावे, सुमुख हळबे,क्षितिज म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश वर्तक यांनी केले तर प्रणय चोधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
What's Your Reaction?






