नालासोपारा : अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या रिक्षाचालकास अटक; ६ किलो गांजा जप्त
नालासोपाऱ्यात खुलेआम अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका रिक्षाचालकास पोलिसांनी अटक केली आहे. वसईच्या गुन्हे कक्ष २ च्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ९० हजार किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला आहे

नालासोपारा - नालासोपारा पूर्व येथे अवैधरित्या अमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीवर वसईच्या गुन्हे कक्ष २ च्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. सुभान हैदर शेख (४२) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसईच्या गुन्हे कक्ष २ चे पथक नालासोपाऱ्यात गस्ती घालत असताना त्यांना एक संशयी व्यक्ती आढळून आली. सदर व्यक्तीची अंगझडती घेतल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडून ९० हजार किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला आहे. सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून याआधी त्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बांद्रा, बोईसर आणि साकीनाका आदी पोलीस ठाण्यात ४ गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, साहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ आणि गुन्हे शाखा २ वसई कक्षाचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे आदींच्या पथकाने केली.
What's Your Reaction?






