विरार : नाताळनिमित्त साहित्य चावडीवर पार पडला विशेष कार्यक्रम
लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व अजीव पाटील यांच्या सहकार्याने दर महिन्याला विरार पश्चिम येथील मंगलमूर्ती मंदिर येथे महिन्यातून एकदा साहित्य चावडीचे आयोजन करण्यात येते.

विरार - नाताळ सणाचे औचित्य साधून विरार पश्चिमेच्या मंगलमुर्ती मंदिर येथे साहित्य चावडीवर 'प्रभू येशूचा जीवनपट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ६४ व्या पुष्पात सरपंच कवी एमेल जोसेफ आल्मेडा यांनी प्रभू येशूचा जीवनपट रसिकांसमोर उलगडून दाखविला. नाताळ सणाचे महत्व पटवून देतानाच त्यांनी सर्वधर्म समभाव तसेच आपण सर्वच सण एकत्र येऊन साजरे करायला हवेत असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व अजीव पाटील यांच्या सहकार्याने दर महिन्याला विरार पश्चिम येथील मंगलमूर्ती मंदिर येथे महिन्यातून एकदा साहित्य चावडीचे आयोजन करण्यात येते. साहित्य चावडी हा स्तुत्य उपक्रम असून समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी चावडीचे आजोजन एकाच ठिकाणी न करता गावागावात करावे असे मत मांडून आल्मेडा यांनी आपण नंदाखाल गावात यासाठी पुढाकार घेण्यास तयार आहोत असेही यावेळी सांगितले.
'प्रभू येशूचा जीवनपट' या विषयावर सरोज भिडे, समीर पराडकर, गोविंद घरत, सुचित्रा पितळे, मानसी शिकवण, तृप्ती भंडारे स्वाती नाईक अशा अनेक साहित्यिकांनी येशूंविषयी आपले विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रांत केसरकर आणि दीपाली जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मधुकर तराळे यांनी केले तर सुरेखा कुरकुरे यांनी आभार मानले.
What's Your Reaction?






