वसई-विरार महापालिकेची ‘बोगस डॉक्टर`मुक्त मोहीम! नालासोपारात दोघा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

वसई-विरार महापालिकेची ‘बोगस डॉक्टर`मुक्त मोहीम! नालासोपारात दोघा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल

विरार : वसई-विरार महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘बोगस डॉक्टर`मुक्त वसई-विरार मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत नालासोपारा परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघा व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सुनील हिरालाल यादव व पुष्पा यादव अशी या दोघांची नावे असून, हे दोघे नालासोपारा पूर्व-धानीवबाग येथे वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांची फसवणूक करत होते. त्यांच्याविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नालासोपारा (पू.), वसई (पू.) आणि विरार (पू.) परिसरात अवैध वैद्यकीय व्यावसायिक प्रॅक्टीस करीत असलेल्याबाबत महापालिकेला तोंडी माहिती प्राप्त झाली होती. अशा अवैध वैद्यकीय व्यावसायिकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहण्याची शक्यता असल्याने त्यांना शोधून त्यांच्यार कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे होते. याअनुषंगाने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (वैद्यकीय आरोग्य) व डॉ. भक्ती चौधरी, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी वैद्यकीय आरोग्य विभागातंर्गत कार्यरत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना धाडसत्र घेऊन दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सदर सुचनेनुसार दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी धाडसत्रातंर्गत अवैध वैद्यकीय व्यावसायिकांवर संबंधित पोलीस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. दरम्यान; अवैध वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी सदरचे धाडसत्र असेच सुरू राहणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे. वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्र बोगस डॉक्टर मुक्त करण्याचे आवाहन स्वीकारून महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यरत राहणार आहे. त्यामुळे अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांपासून सावध राहा. तसेच असे इसम आपल्या कार्यक्षेत्रात असल्यास याबाबत वैद्यकीय आरोग्य विभाग, सातवा मजला, मुख्य कार्यालय, विरार पश्चिम येथे माहिती देण्यात यावी. आपण दिलेल्या माहितीबाबत गोपनीयता ठेवण्यात येईल, असे आवाहन वसई-विरार महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow