विरारमध्ये परप्रांतीय व्यक्तीकडून महिलेला आणि तिच्या मुलीला मारहाण

विरार - विरारमध्ये किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय व्यक्तीने आई आणि मुलीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पूर्वेच्या तुलशीधाम सोसायटीत ही घटना घडली आहे. काल 27 नोव्हेंबर बुधवारी रात्री 9:45 वाजता घडलेला हा संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यामुळे मारहाण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीवर आणि त्याच्या पत्नीवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खिळा ठोकण्याच्या कारणावरुन मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही मध्ये तर एक पुरुष अर्धनग्न दिसत आहे आणि तो महिलेचे केस पकडून तिला बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. महिला व मारहाण करणारी व्यक्ती एकाच इमारतीत शेजारी राहणारे असून दरवाज्यावरील खिळा ठोकण्याच्या कारणावरुन ही मारहाण झाली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गौतम पांडे,आणि त्याची पत्नी प्रतिभा पांडे,असे गुन्हा दाखल झालेल्या पती पत्नीचे नावे आहे. रीना धुरी आणी निशा धुरी असे मारहाण झालेल्या आई आणि मुलीचे नाव आहे.
विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या मारहाणी नंतर आईने आणि मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत परप्रांतीय व्यक्ती विरोधात मारहाण करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, कलम 74,115,(2), 352,351(2) अंतर्गत महिलेला मारहाण करून विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विरार पोलिसांनी पती पत्नीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, या परप्रांतीय व्यक्तिने आई आणि तिच्या मुलीला मारहाण केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये स्पष्ट मारहाण केल्याचे दिसत आहे. मारहाण करताना मुलगी खाली देखील पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. दरम्यान, या घटनेनंतर तुलशीधाम सोसायटीतील सर्व नागरिक एकत्र जमा झाले होते. त्यांच्या मध्यस्थीने आई आणि मुलीचा बचाव करण्यात आला. मात्र, वेळीच नागरिकांनी मध्यस्थी केली नसती तर परप्रांतीय व्यक्तीने अधिक मारहाण केली असती असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
What's Your Reaction?






