विरार मध्ये श्री जीवदानी देवी संस्थानच्या नवीन डायलेसिस विभागाचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण

वसई :श्री जीवदानी देवी संस्थान तर्फे, श्री जीवदानी देवी मंदिर डोंगराचे पायथ्याशी १० मशीनच्या डायलेसिस विभागाचे लोकार्पण आज आमदार हितेंद्र ठाकूर,आमदार क्षितिज ठाकूर,आमदार राजेAह पाटील,माजी महापौर राजीव पाटील माजी उपमहापौर उमेश नाईक,,जीवदानी मदर ट्रस्ट चे अध्यक्ष प्रदीप तेंडोळकर,उपाध्यक्ष पंकज ठाकूर ,माजी सभापती जितू भाई शहा,आजीव पाटील,ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काशिनाथ वयातील यांच्या उपस्थित संपन्न झाले
जीवदानी मंदिरच्या पायथ्याशी सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात उपचार घेणा-या रुग्णांना, सरासरी १०००/- खर्च अपेक्षित आहे, या मधून रु,. ३५०/- वसई विरार महानगरपालिका आर्थिक सहाय्य करते व बाकी आर्थिक भार श्री जीवदानी देवी संस्थान करणार आहे आणि रुग्णाला फक्त रु ५०/- अशा नाममात्र फी मध्ये ही सेवा उपलब्ध करून देणार आहे. अशाच प्रकारची सेवा दत्त मंदिर विरार( पश्चिम )व के एम पी डी हायस्कूल तुळिंज, नालासोपारा येथील दोन्ही डायलेसिस सेंटर मध्ये स्व. तारामती हरिश्चंद्र ठाकूर चॅरीटेबल ट्रस्ट व इतर सहयोगी संस्थेंच्या सहकार्याने फक्त रु ५०/- मध्ये दिली जाते अशी माहिती स्व. तारामती हरिश्चंद्र ठाकूर ट्रस्ट चे अध्यक्ष अजीव पाटील यांनी दिली. रुग्णाला डायलेसिस, डायलेझर,ट्युबिंग,आय.व्ही. सेट,इंजेक्शन, डॉक्टर फी, या सर्व सोयी संस्था पुरवणार आहे. त्या शिवाय या रुग्णांना डायलेसिस करतांना थकवा जाणवू लागतो, त्यामुळे त्यांना तातडीने पौष्टिक नास्ता सुध्दा देणार आहे.
या कार्यक्रमा नंतर विवा महाविद्यालयातील बायो लाब आणि केमिस्ट्री लॅब चे उदघाटन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक विलास चोरघे,,प्रफुल साने,माजी नगराध्यक्ष अजय खोखणी ,महाविद्यल्याच्या दीपा शर्मा ,,कल्पना राऊत,शिंदे सर ,नारायण कुट्टी सर व इतर मान्यवर उपस्थित होते
What's Your Reaction?






