विवा महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

विरार : “रक्त दान हेच सर्वश्रेष्ठ दान “ असं म्हटलं जातं. याचाच आदर्श घेत विरार येथील विवा महाविद्यालयात लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नायर हॉस्पिटल आणि सरला ब्लड बँक, विवा महाविद्यालय हॉटेल मॅनेजमेंट विभाग आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NCC) , एनएसएस युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरात 5 EME कंपनी आणि 8 Mah गर्ल्स BN NCC युनिट तर्फे नायब सुभेदार जी. व्यंकटेसन आणि पी. एस. करवंदे यांनी उपस्थिती लावली.
या शिबिराला संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, खजिनदार शिखर ठाकूर यांनीही रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडत इतरांचा उत्साह वाढवला. दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरातून या शिबिरात ११४ युनिट रक्त जमा झाले. त्यात एनसीसी, एनएसएस युनिटच्या अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान करत आपले योगदान दिले.
ट्रस्टच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी, प्राचार्य डॉ.वी.श.अडिगल, उपप्राचार्य डॉ. प्राजक्ता परांजपे, उप प्राचार्या तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. दीपा वर्मा, हॉटेल आणि टुरिझम मॅनेजमेंट मधील हॉस्पिटॅलिटी स्टडीज आणि कलिनरी आर्टचे विभागप्रमुख वैभव पाटील, एनसीसी प्रमुख वैभव सातवी, एनसीसी ऑफिसर क्षितिजा पालव ( सिटीओ), डॉ. दीपक गुप्ता, डॉ. स्मिता पिलई, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ.दीपा दळवी, कोमल पाटील, डॉ. मधुरा सुर्वे व अन्य सहकारी वर्ग यांची साथ लाभली. ही संपूर्ण रक्तदान शिबिर प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी एनसीसी, एनएसएस युनिट आणि हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे विद्यार्थी विशेष मेहनत घेत होते.
What's Your Reaction?






