विसर्जनावेळी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला महानगरपालिकेमार्फत रु.५ लाखांचे आर्थिक सहाय्य!

विरार :- वसई-विरार शहर महानगरपालिकेने प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार अंतर्गत विरार पूर्व येथे कृत्रिम तलावाबरोबरच टोटाळे तलाव या नैसर्गिक तलावावरही गणेशमूर्तीं विसर्जनाची सोय केली होती. या तलावात विसर्जनासाठी महानगरपालिकेमार्फत सदर परिसरातील पोहता येत असलेल्या स्वयंसेवक मुलांची नियुक्ती करण्यात आली होती. १८ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटे ३.३० वाजता या स्वयंसेवक मुलांपैकी अमित सतिश मोहिते, वय २४ वर्षे, रा.फुलपाडा, विरार पूर्व यांचा विसर्जन करतेवेळी फिट आल्याने पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आल्यावर तेथे उपस्थित महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तात्काळ बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले; परंतु तोपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेऊन आमदार क्षितीज ठाकूर यांनी दुदैवी मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबियांना महानगरपालिकेकडून आर्थिक मदत मिळणे बाबत आयुक्त अनिलकुमार पवार यांना पत्राद्वारे कळविले होते. ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी महानगरपालिकेमार्फत आर्थिक मदतीचा रक्कम रु.५ लाखाचा धनादेश मृत युवकाच्या कुटुंबियांना आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, पालिकेचे उप-आयुक्त सदानंद पुरव, सहायक बआयुक्त विक्टर डिसोजा, मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव उपस्थित होते.
What's Your Reaction?






