संभाव्य एचएमपीव्ही संसर्ग रोखण्यासाठी वसई विरार महापालिका सज्ज

चीन मधून आलेला नवीन विषाणू मानवी मेट्यानूमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या संसर्गाला रोखण्यासाठी वसई विरार महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. यासाठी पालिकेच्या प्रत्येक रुग्णालय, दवाखाने आणि आरोग्य केंद्राना विशेष सुचना देण्यात आल्या असून औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला आहे. एचएमपीव्ही या विषाणू बाबत नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे. पालिेकेने मात्र अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये असे आवाहन नागरिकांना केले आहे. एचएमपीव्ही हा श्वसनाशी संबंधित आजार आहे. या विषाणूमुळे श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरते.
खोकला किंवा शिंका आल्यास तोंड आणि नाक रुमालाने झाकावे, सॅनिटायझरने वारंवार हात धुवाने, खोकला, शिंका आल्यास सार्वजनिक ठिकाणापासून लांब रहावे, भरपूर पाणी आणि पौष्टिक अन्न खावे असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे तर हस्तांदोलन करू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, सेल्फ मेडिकेशन घेऊ नये, डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये असा सल्ला दिला आहे
What's Your Reaction?






